करूया सनातन धर्माचे गुणगान ||
प्राचीन, अति प्राचीन या धर्माची परंपरा |
कुटुंब म्हणजे संपूर्ण वसुंधरा ||
याची मुख्य भूमी आहे भारत |
अनेक घडली येथे संवत ||
इथले देव म्हणजे शब्दांच्या पलीकडचे |
ब्रम्हणस्पती, ब्रम्ह, श्रीहरी, रूद्र असे नाव त्यांचे ||
विश्वकर्मा अभियंता देवांचा |
निर्माता सुंदर द्वारावतीचा ||
शेवटी सांगणे हेच की |
सनातन हिंदु धर्म म्हणजे विज्ञानच की ||
विज्ञानालाच वेद, पुराणे म्हणती शास्त्र |
हेच आहे प्रत्येक मानवाचे अस्त्र ||
मानवता हाच खरा धर्म |
त्याचे रक्षण आपले कर्म ||
मला सर्व धर्म वंदनीय |
पण काही लोकांना का आहे माझा धर्म अवंदनीय ||
तेही मला आहे मान्य |
पण फक्त द्वेशापोटी निष्पाप हिंदूंची हत्या कशी करावी मान्य?
बंगाल आहे अशांत |
पण माध्यमे मात्र पूर्णपणे शांत ||
इतर धर्माचे सण साजरे करण्यास नाही माझा विरोध |
पण त्यांचा मात्र आपले सण साजरे करण्यास आहे विरोध ||
मग का करावे त्यांचे सण आपण साजरे?
विशेष म्हणजे हिंदूंना ख्रिस्ती, मुस्लिम सणांच्या शुभेच्छांचे वाहते वारे ||
ठरवूया आजपासून |
नाही देणार हिंदूंना ख्रिश्चन आणि मुस्लिम सणांच्या शुभेच्छा आवर्जून ||
धर्म आहे आपला धोक्यात |
त्याला वाचवणे हे कर्तव्य, ठेवूया डोक्यात ||
घेतो आहे छोट्या तोंडी मोठा घास |
सनातन धर्म पुढे नेणे हाच आहे माझा ध्यास ||
🕉️ सनातन हिंदु धर्म की जय 🚩
सर्वेपि सुखिनः सन्तु |
सर्वे सन्तु निरामयः ||
सर्वे भद्राणि पश्यन्तु |
मा कश्चित् दुःख माप्नुयात ||
शुभं भवतु |🙏🏻
- सोहम पटवर्धन
_______________________
Follow Me on Social Media :
🖊️ Facebook : https://www.facebook.com/SohamPatwardhan.28
🖥️ YouTube :
📸 Instagram :
🐦 Twitter :
No comments:
Post a Comment